। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करत पोलिसांनी अंदाजे 3 लाख 75 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानसर गाव, मस्जिद ठाकूरपाडा, पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी झहीर इस्माईल कुरेशी (43) रा. मिरा-भाईंदर याच्या ताब्यातील आयशर ट्रकमधून सुमारे दीड हजार किलो गोवंश मांस, जनावराचे मुंडके तसेच इतर अवयव जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई अझरुदीन अजीज पठाण यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना कोणताही वैध परवाना नसताना गोवंशाची कत्तल करून विक्रीच्या उद्देशाने मांसाची वाहतूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वपोनि प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नांगरे करीत आहेत.
Illegal beef Transport: तळोजामध्ये गोमांसाच्या अवैध तस्करीचा पर्दाफाश
