कोल्हारे जलवाहिनी टाकण्याचे काम बेकायदा?


नळपाणी योजनेला मंजुरीच नाही

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत टाकण्यात येणारी जलवाहिनी बेकायदेशीर असल्याचे उघड झाले असून,त्याबाबत योग्य तो खुलासा करण्यात ग्रामपंचायत प्रशासन निरुत्तर झाल्याचे दिसत आहेत.
गावात विविध भागात मागील काही दिवसांपासून काळ्या रंगाचे पाईप जलवाहिन्या म्हणून टाकल्या जात आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यासर्व प्रश्‍नांबद्दल ग्रा.पं.सदस्य विजय हजारे यांनी मासिक सभेत अनेक प्रश्‍न तसेच उपप्रश्‍न उपस्थित केले.मात्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी मंजूर केली नाहीत अशा नळपाणी योजनेचे बेकायदा काम सुरु असल्याचं आरोप केल्यावर त्या सर्व प्रश्‍नांना ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बेकायदा नळपाणी योजनेच्या कामाबद्दल ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला जबाबदार धरून करावी करावी अशी मागणी सदस्य विजय हजारे यांनी केली आहे.
धामोते येथील धनेश्‍वरी येथील धामोते गावाच्या नळपणी योजनेच्या विहिरीतील पाणी उचलून ते नवीन वसाहत भागात देण्यासाठी मागील दोन महिन्यापासून काळ्या रंगाचे रबराचे पाईप टाकले जात आहेत. या नवीन वसाहत परिसराला 2021 पर्यंत नेरळ नळपाणी योजनेमधून शुद्ध पाणी दिले जात होते. नेरळ पाणी योजनेच्या बोर्ले येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून वसाहत भागात पाणी दिले जाते. मात्र तो भाग कोल्हारे ग्रामपंचायतीचा असल्याने त्या सर्व भागाला कोल्हारे ग्रामपंचायत च्या नळपाणी योजनेतून पाणी घ्यावे अशी अट घातली जात आहे. त्यामुळे नवीन रबरी जलवाहिनीच्या नळपाणी योजनेचे पाणी वितरित करण्यासाठी नेरळ-कळंब रस्ता तसेच नेरळ- तळवडे रस्ता आणि नेरळ -कशेळे रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यासाठी कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नाही असे सांगण्यात येत आहे.त्याचवेळी धनेश्‍वरी येथील उल्हासनदीच्या पात्राजवळ असलेल्या विहिरीजवळ कोणत्याही प्रकारचे जलशुद्धीकरण केंद्र नाही आणि थेट नदीमधून विहिरीत आलेले पाणी जलवाहिनी मधून सोडले जात आहे.

प्रशासन मनमानी पणे स्वतःच्या हितसंबंध जपण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जलविहिणी टाकून पाणीपुरवठा कर्णयुगाचा प्रयत्न करीत आहे. थेट नदीमधून उचललेले पाणी आणि त्यावर कोणतीही प्रक्रिया न केलेले अशुद्ध पाणी पुरवठा करणारी नवीन वसाहत मधील बिल्डर यांनी घ्यावे यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र अशी कोणती नळपाणी योजना जिल्हा परिषदेने मंजूर केली आहे याची माहिती द्यावी.

विजय हजारे- सदस्य कोल्हारे ग्रामपंचायत


Exit mobile version