उरणमध्ये अवैध्यरित्या माती उत्खनन

शासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील अनेक डोंगर कपाटीतीत अंधार्‍या रात्री मातीचे उत्खनन सुरू आहे. मात्र याची माहिती असूनही अधिकारीवर्ग सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
वाढत्या औद्योगिकारणामुळे मातीला मागणी वाढली आहे. माती मिळणे अवघड बनल्याने व त्यासाठी परवानगी मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता मातीचे उत्खनन केले जात आहे. तर काही ठिकाणी शासकीय डोंगराला पोखरण्याचे काम सुरू आहे. सदर मातीची चोरी ही रात्री मातीचे उत्खनन सुरू असते. जेणेकरून मातीची नेल्याने रॉयल्टी अथवा इतर त्रास न होता हपापाचा माल गपापा करणे सहज शक्य होते. तसेच शासकीय यंत्रणा ही माहिती असून जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.
रात्री मातीचे उत्खनन सुरू असल्याने लोकांच्या तक्रारी ही कमी प्रमाणात शासकीय कार्यालयाकडे येत असतात. जर एखाद्याने तक्रार केली तरी आम्हांला माहिती नाही. माहिती घेऊन कारवाई करतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे होतात. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची नोंद घेऊन उरणमधील बेकायदेशीर सुरू असलेल्या माती उत्खनन थांबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा तालुक्यातील शासकीय मातीचे असलेले डोंगर भविष्यात माती उत्खनन करणारे गिळंकृत केल्याशिवाय रहाणार नाहीत.

Exit mobile version