। पनवेल । वार्ताहर ।
भिंगारी परिसरातील एका टपरीवर बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यावर टपरीवर पनवेल शहर पोलिसांनी छापा टाकला असून गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अभिजीत अभंग, पोलीस शिपाई समाधान पाटील, राजपुरे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर हद्दीतील गस्तीवर होते. यावेळी अभंग यांना मिळालेल्या माहितीनुसार ओएनजीसी कंपनीच्या गेटच्या बाजूला असणाऱ्या किरणा माल विक्रीच्या दुकानामध्ये एक व्यक्ती गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करीत होती. त्यानुसार पथकाने दुकानामध्ये छापा टाकून तेथील माल जप्त केला आहे.