| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर शहरातील प्रभाग क्रमांक 30 ओवे गाव या ठिकाणी बेकायदा मद्य विक्री प्रकरणी संगीता पांचाळ यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांनी केली. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मद्य विक्री होत असताना अन्य ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई केल्याने खारघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जात आहे.
खारघर शहरातील प्रभाग क्रमांक 30 मधील ओवे गावातील विठाबाई निवास इमारतीच्या जिन्याखाली एक महिला मद्य विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 10 हजार 690 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. इतर ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई केल्याने बेकायदा मद्य विक्री खारघर पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे.






