आई एकविरा भक्तांची बेकायदेशीर लूटमार?

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून दरवर्षी हजारो भक्त येत असतात. मात्र, या भक्तांची गावात प्रवेश करताच लुटमार होत असल्याचे समोर आले आहे.

गावात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाकडून ग्रामपंचायतीतर्फे 50 रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. त्यानंतर वाहन पार्किंगसाठी संयुक्त समिती बेहरोलेमार्फत चारचाकी वाहनधारकांकडून 50 रुपये व दुचाकीधारकांकडून 20 रुपये स्वतंत्रपणे वसूल केले जातात. विशेष म्हणजे, ही पार्किंगची जागा वनक्षेत्रात येते. चौकशीदरम्यान वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांनी ही समिती ग्रामपंचायत आणि वनविभागाची संयुक्त असल्याचे सांगितले आहे. मात्र, मावळ तालुक्याचे वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी अशा प्रकारच्या वसुलीला अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, दररोज हजारो भाविकांकडून चालणारी ही बेकायदेशीर वसुली थांबवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. या लुटमारीविरोधात कागदोपत्री लढाई लढण्याची तयारी असून, जर एखादी संघटना पुढे येईल, तर आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे समाजसेवक देवव्रत विष्णू पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version