बिअरच्या बाटल्यांची बेकायदा विक्री

| पनवेल | वार्ताहर |

बेकादेशीररित्या ढाब्यावर विक्रीस ठेवलेल्या बिअरच्या बाटल्या पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत करून एका इसमाविरोधात कारवाई केली आहे.

पुष्पकनगर येथील स्वीटी ढाबा या ठिकाणी बेकायदेशीररित्या बिअरच्या बाटल्या विक्रीस ठेवल्या असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिह शिंदे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सात बिअरच्या बाटल्या ज्याची किंमत 1295 /- रु. इतकी असून, त्या हस्तगत केल्या आहेत. आरोपी सुभाष गोल्हार याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version