| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील उलवे नोड, सेक्टर 18 परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याबाबत नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत सिडको प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या आहेत. या कार्यवाहीमुळे परिसरातील पाणी साचण्याची समस्या कमी होण्यास मदत झाली असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर सेक्टर 18 मधील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्यावतीने कार्यरत अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशन, तसेच शिवशंभो देवालय ट्रस्ट यांच्यावतीने परिसरातील रहिवाशांनी सिडको प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. सिडको नेहमीच नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही अशाच संवेदनशील व त्वरित कार्यपद्धतीद्वारे नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील, असे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले.
CIDCO Administration: पाण्याच्या निचऱ्याची तातडीने उपाययोजना
