एसटी संपाबाबत तातडीने तोडगा काढा

विधानपरिषद सभापतींचे आदेश
| मुंबई | प्रतिनिधी |

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिल्या आहेत. आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांसोबत चर्चा करण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्या आहेत. तर याबाबत आपण चर्चेसाठी समिती स्थापन करण्यास तयार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या मुद्यावर मंगळवारी विधान परिषेदत चर्चा झाली. त्यावेळी अनिल परब यांनी सरकारची भूमिका मांडली. आम्ही कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात वाढ केली. तरीदेखील कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले. बाकीच्या राज्यांच्या कर्मचार्‍यांच्या पगाराप्रमाणे आम्ही कर्मचार्‍यांची वेतनवाढ केली. मात्र, कर्मचार्‍यांनी विलीनीकरण मुद्दा कायम ठेवला. कोर्टाने निर्णय देऊन देखील संप बेकायदेशीरपणे सुरू असल्याची माहिती परब यांनी सभागृहाला दिली.

विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये किती हाल झाले ते आपण पाहिले आहेत. या प्रश्‍नावर सरकारने आणि विरोधी पक्षनेत्यांनी दोन्ही सभागृहांची एक समिती तयार करुन त्यांच्यासोबत चर्चा करा आणि हा प्रश्‍न मार्गी लावा.

रामराजे नाईक निंबाळकर, सभापती
Exit mobile version