| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौल तुलाडदेवी येथील श्री धावीर उत्सव चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या उत्सवाचे निमित्ताने लाट विधी मोठया श्रध्देने व भाविकतेने साजरा करण्यात आला. चौल तुलाडदेवी नजीकच्या डोंगरात पायथ्याशी श्री धावीर मंदिर आहे. या मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या शेवटच्या दिवशी सायकांळी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात मोठया संख्येने पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती असते. चौल तुलाडदेवी नजीकचे हे मंदिर प्राचीन असल्याचे सांगितले जाते, शिवाय श्री धावीर मंदिराचे उत्सवाचे दिवशी परंपरागत धार्मिक विधी पार पडतो, या विधीला लाट विधी म्हटले जाते. या मंदिरातील उत्सवाला लाट यात्रा सुध्दा संबोधले जाते. यावेळी मोठया संख्येने भाविक श्री धावीराचा दर्शनाचा लाभ घेतात.
या श्री धावीराच्या उत्सवाला मंदिरात अनेकाचे अंगात देव संचारतो, अंगात संचारलेला देवाने वैताच्या छड्डीने अंगावर मारून घेत असतो. मंदिराच्या बाजूलाच बगाड पंरपरागत उभी आहे, या बगातीचा मानाची काठी चौलची भगत आळी तसेच वरंडेपाडा यांच्याकडे असतो. या बगाडीला बोकड अथवा कोंबडाचा मान म्हणून या बगाडीला बोकड व कोंबडा बांधून भक्तगण बगाडीला बसलेल्या देवाना पाचवेळा गोल गोल फिरवितात. यावेळी धावीर देव, महामरी तसेच चौल पंचक्रोशीतील 23 देवाधिकांना हा मान बगाडीच्या माध्यमातून पोहचविला जातो.






