चौक परिसरात उत्साहात विसर्जन

चौक | वार्ताहर |
पाच दिवसांचा मुक्काम करून आज गौरीला बरोबर घेऊन गणराय आपल्या मुक्कामी पुन्हा गेले,पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात गणरायांना निरोप देण्यात आला.अंदाजे 930 घरगुती गणपती व अंदाजे 127 गौरींना निरोप देण्यात आला.
वावंढळ,भिलवले, कलोते,विणेगाव,तुपगाव,आसरे,जांभिवली, लोधिवली, वावर्ले,नढाळ,बोरगाव,आडोशी येथे शुक्रवारी गणरायाचे शुभ आगमन झाल्यावर,रविवारी माता गौरीं चे आगमन झाले, सोमवारी गौरी पूजन झाल्यावर आज दुपारपासून गौरी-गणपती आपल्या गावी निघाले,पुढच्या वर्षी लवकर या,कोरोना मुक्त गणेशोत्सव साजरा होऊ द्या अशी आर्त हाक भक्तांनी मारली आहे.चौक येथे ग्रामपंचायत चौक यांच्या कर्मचारी यांनी धावरी नदीवर येणार्‍या गणपती बाप्पाला निरोप दिला,तर भिलवले, कलोते,वावंढळ लोधिवली, बोरगाव यांनी गावशेजारी असणार्‍या नदीत गणरायाला निरोप दिला. सर्वच ठिकाणी निर्माल्य विसर्जनाची सोय करण्यात आली होती, सर्वच ठिकाणी पोलीस व ग्रामस्थांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार विसर्जन झाल्याने वेळेत व गर्दी न करता गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी शासकीय नियमांचे पालन करण्यात आल्याचे दिसून आले.तर चौक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर प्रत्येक गावच्या पोलीस पाटील यांनीही आपापल्या गावात मार्गदर्शन केले होते.पावसाने शांतता घेतली होती

गणेश विसर्जन घाटाची स्वस्छता
चौक येथील गणेशघाट ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्यावतीने स्वच्छ केल्याने ग्रामस्थ, पोलीस यांनी समाधान व्यक्त केले. चौक येथे गणेश घाट असून येथे चौक,चौक बाजारपेठ, नवीन वसाहत,हातणोली,तुपगाव येथील गणपती-गौरींना निरोप दिला जातो. येथील गणेश घाट परिसर,पाण्यात असलेले शेवाळ-गवत,प्लास्टिक कचरा ग्रुप ग्रामपंचायत च्या सर्व कर्मचारी यांनी स्वछ केला,विशेष म्हणजे आज सार्वजनिक सुट्टी असूनही चौक चे ग्रामविकास अधिकारी, प्रशासक सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version