महिलांकडून पारंपरिक नृत्याचे सादरीकरण
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने मुरुड बाजारपेठेतील भाजी मार्केटजवळ भैव्य मंडपात साखरचौथ गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावेळी दीड दिवसात मुरुड शहरांसह पंचक्रोशी भागातील हाजारो गणेशभक्तांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी महाप्रसाचा आस्वाद घेतला. विसर्जनाच्या आधी गणेशाच्या मूर्तीची उत्तर पूजा पुरोहित नरेंद्र सिंह कछवाह यांच्याकडून करण्यात आली.
तद्नंतर श्री गणपती बाप्पाची आरती करून गणपती बाप्पाला सजवलेल्ला हातगाडीत ठेवण्यात आले. डिजेच्या तालावर फटक्यांची आतिषबाजी करत शेकडो महिलांनी पारंपरिक फुगडी नृत्य सादर केले. भाविकांनी हातात भगवे झेंडे घेऊन गाण्याच्या तालावर नाचत गाजत बाजारपेठ ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत ‘बाजारपेठ राजाची’ मिरवणूक समुद्रकिनारी रात्री 11.30 दरम्यान नेण्यात आली. तद्नंतर गणपती महाआरती करुन ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ घोषणा देऊन विसर्जन करण्यात आले. यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







