| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड परेश नाका ते समुद्र लाईन ते मच्छिमार्केट ते एकदरा पुलापर्यंतचा रस्त्याला खड्डेच खड्डे पडल्याने या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या येऊ लागल्याने मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. परंतु, भरलेले खड्डे काही दिवसातचं पुन्हा उखरल्याने रस्तावर पुन्हा खड्डेच खड्डे दिसून लागले आहेत. यामुळे यंदा ही गणपती बाप्पांचे विसर्जन खड्ड्यातुन करावा लागणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावासाचं मूहुर्त पाहुन रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. परंतु, खड्डे बुजविताना चांगली डांबर खडी मिक्स करुन भुसा टाकला असतातर ही खडी पावासाच्या सरीत वाहुन गेली नसती. परंतु, दे ढकल काम केल्याने पुन्हा जैसे थे रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसुन आले. पुन्हा याच रस्त्यावरून नागरिकांना व वाहन चालकांना खड्ड्यातुन प्रवास करावा लागत आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन दोन दिवस बाकी आहेत. पुन्हा पडलेले रस्त्यावरचे खड्डे कधी बुजवणार? हा रस्ता नवीन बनविण्यासाठी सरकारने लाखो रूपयांचा निधी मंजूर केला. परंतु, ही निधी दोन वर्ष पडुन आहे. दोन वर्षे झाली तरी ही हा रस्ता नव्याने बनवत नाही. फक्त डागडुजी करायची आणि शासनाचा पैसा वाया घालावाचा. सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जाग येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मुरूड पर्यटन क्षेत्र असुन रोज शेकडो पर्यटक या खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करित असतात. यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिक चिंतेत आहेत.
गणपती बाप्पांचे विसर्जन खड्ड्यांतूनच
