बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना राबवा- आ. जयंत पाटील

। नागपूर । प्रतिनिधी ।

राज्यातील विविध जिल्ह्यात शासनाकडून लाखो रूपये धर्च करून ग्रामीण भागातील मुलांना पोषण आहार दिला जात असून त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असून, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात 795 बालके कुपोषित असल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी 85 बालके मृत्यूशी झुंज देत आहेत. हे बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी केली.

या संदर्भात अन्य आमदारांनीही मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते. गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी असलेल्या अमृत आहार योजनेसाठी धान्य विकत घेऊन या मातांना अंगणवाडी सेविका, मदतनीसांमार्फत 35 रूपयांत जेवण देण्यात येत होते, परंतु वाढत्या महागाईमुळे त्यांना परिपूर्ण आहार मिळत नसल्यामुळे शहापूर तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. कुपोषण कमी होण्याकरीता मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषक आहार देण्याची योजना राबविण्यात येत असताना अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आदिवासी भागातील मदतनीसांची हजारो पदे रिक्त आहेत, अशी विचारणा केली आहे.

यावर मंत्री मंगलप्रसाद लोंढा यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर महिला व स्तनदा माता यांना यमित घरपोच आहार पुरवठा करण्यात येतो. तसेच 3 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांना गरम राजा आहार नियमितपणे पुरविण्यात येतो, असे नमूद केले आहे.

Exit mobile version