बेलोशीत जनमन योजनेची अंमलबजावणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री जनमन या योजना सुरु करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बेलोशीमध्ये बुधवारी (दि. 10) जानेवारीला या योजनेची अंमलबाजवणी करण्यात आली. यातून सुमारे 77 हून अधिक आदिवासी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला.

अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रामराज मंडळ अंतर्गत असलेल्या सर्व आदिवासीवाड्यांचा बेलोशी आदिवासीवाडी येथे रामराजचे मंडळ अधिकारी आर.एन. मांढरे, पेण येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथील प्रतिनिधी श्यामकांत ठाकूर, तलाठी प्रदीप थोरात, शशिकांत कांबळे, सरफराज डफेदार व इतर कर्मचारी यांनी मेळावा आयोजित करून नवीन आयुष्यमान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड नवीन नोंदणी व उत्पन्न दाखला, आधार कार्ड, जातीचे दाखले व इतर शासकीय दाखले वाटप करण्यात आले. बेलोशीचे सरपंच कृष्णा भोपी यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बेलोशी परिसरातील असंख्य आदिवासी समाज उपस्थित होता.

Exit mobile version