मानवी आयुष्यात झाडांचे महत्त्वपूर्ण योगदान

शिवकार्य ट्रेकर्सचे रोहिदास ठोंबरे यांचे प्रतिपादन
| रसायनी | वार्ताहर |

मानवी आयुष्यात झाडांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. झाडे आहेत म्हणून आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण, या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो, असे मत वृक्षारोपण करतेवेळी शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे यांनी व्यक्त केले. किल्ले सोंडाई गडपरिसरात रविवार, दि.24 जुलै रोजी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

शिवकार्य ट्रेकर्स टीम गेली पाच वर्षे सातत्याने किल्ले सोंडाई गडपरिसरात संवर्धनासाठी मोहिमा घेत आली आहे. आजसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपून किल्ले सोंडाई परिसरात बांबू, गुलमोहर, आपटा, शिसव, निलगिरी आदी प्रकारची झाडे लावण्यात आली. ही वृक्षारोपण मोहीम शिवकार्य ट्रेकर्स खालापूर विभाग वतीने आणि वनविभाग अलिबाग, वनपरिक्षेत्र खालापूर कर्जत तसेच ग्रामपंचायत बोरगाव व सोंडेवाडी ग्रामस्थ वतीने घेण्यात आली. या मोहिमेत शिवकार्यचे संस्थापक रोहिदास ठोंबरे, बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पप्पू झोरे, वनपाल रमेश झोरे, महेश दुर्गे, प्रसाद जाधव, जितेंद्र कदम, मंदार उतेकर, आकाश गोडीवले, रमेश शिंदे, विकास मालुसरे, मनीष आमकर, प्रशांत शेलार व सागर गंभीरराव हे दुर्गसेवक सहभागी झाले होते.

Exit mobile version