एमपीएससी आयोगाचा महत्वाचा निर्णय

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्व क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. देश आणि राज्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठी समस्या पदभरती करणं ही असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने आपला पदभरती कार्यक्रम जाहीर करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा भरतीच्या 2019 परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोगानं जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकाणी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखती या 4 ते 14 ऑक्टोंबरदरम्यान पार पडणार आहेत. परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आयोगाच्या या निर्णयाची उतीर्ण झालेले विद्यार्थी गेली 2 वर्ष झालं वाट पहात होते. राज्यातील नोकरभरती लांबत चालल्याने सरकारवर परीक्षार्थी प्रचंड नाराज आहेत. गेली दोन वर्ष झालं नवीन भरती झाली नाही. या परीक्षांना उशीर होतोय, म्हणून रस्त्यावर उतरणारे परीक्षार्थी देखील राज्याने पाहिले आहेत. यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रशासकीय आस्थापनांना, 30 सप्टेंबरपर्यंत नवीन जागांसाठीचे मागणीपत्र सरकारला पाठवा, अशी सूचना केली आहे. राज्यातील एमपीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना काळात तणावात असणारे विद्यार्थी राज्य सरकाच्या अनास्थेमुळे त्रस्त झाले आहेत. परीक्षार्थ्यांनी राज्य शासनाला आंदेलनाचा इशारा सुद्धा दिला आहे, म्हणून सरकार आता नोकरभरतीवर लक्ष देत असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version