सिडको कार्यालयातून महत्त्वाची फाईल गायब

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| चिरनेर | प्रतिनिधी |

नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथील सिडको मुख्यालयातून भूखंडांशी संबंधित एक अत्यंत महत्त्वपूर्ण फाईल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हि फाईल 12 मार्च 2008 ते जून 2018 या दरम्यानच्या काळात सिडको वसाहत विभागातून गहाळ झाली आहे. अरुण काशिनाथ मुंबईकर यांनी 2016 मध्ये माहितीच्या अधिकारात या भूखंडांची माहिती मागितली होती. तेव्हा फाईल नव्हती. राज्य माहिती आयोगाने गंभीर दखल घेत त्रिस्तरीय समिती नेमली. परंतु, फाईल न सापडल्याने आयोगाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. सिडकोचे क्षेत्रीय अधिकारी सचिन कडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करीत आहेत. उच्च सुरक्षा असलेल्या सिडको कार्यालयातून महत्त्वाची फाईल गायब झाल्याने जमिनीच्या घोटाळ्यासाठी फाईल जाणीवपूर्वक नष्ट केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version