अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलिबाग- रेवदंडा मार्गावरील पाल्हे पुलावरून पाणी वाहत असून नागरिकांनी या मार्गावरन प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.