| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवी दिल्ली येथे 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेमुळे सरकारने सुमारे 200 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आणखी 100 गाड्यावर परिणाम होणार आहे.
दिल्लीत रेल्वेने रद्द केलेल्या विविध गाड्यांची यादी जाहीर केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार 300 हून अधिक गाड्या यामुळे प्रभावित होणार असून 300 हून अधिक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे 7 ते 10 सप्टेंबर दरम्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्याचे हाल होणार आहे, तेव्हा या कालावधीत प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यायला हवी.
दिल्लीमध्ये जी20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे महत्त्व लक्षात घेता रेल्वेचे नियोजन केले गेले आहे. प्रवाशांनी यादीत दिलेल्या तारखा आणि गाड्या लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आव्हान रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. उत्तर रेल्वेने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यातच दिल्ली पोलिसांनी आयोजनाआधी दिल्लीमध्ये रेल्वेने येणाऱ्या आणि दिल्लीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी प्रकाशित केली होती. 6 सप्टेंबर ते दहा डिसेंबर 2023च्या पहाटेपर्यंत बंदी राहणार आहे.