भीक मागण्यावर बंदी अशक्य

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी भिकार्‍यांना ट्राफिकमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारपेठांमध्ये भीक मागण्यापासून रोखण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने भिकार्‍यांना भीक मागण्यास मज्जाव करू शकत नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितलं. भीक मागणे हा एक सामाजिक आणि आर्थिक मुद्दा आहे आणि गरीबी लोकांना भीक मागण्यासाठी भाग पाडते. असं वक्तव्य करत न्यायालयाने एका याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे. ज्यामध्ये कोरोना संकटादरम्यान सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर भीक मागण्यावर बंदी घालण्याची मागणी केली गेली होती. न्याय धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम.आर.शाह यांच्या खंडपीठाने कुश कालरा यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला.

Exit mobile version