…अखेर ‘त्या’ नराधमाला बलात्कार प्रकरणी सक्त कारावासाची शिक्षा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

तालुक्यातील मांडवा परिसरातील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी राकेश संजय शिंदे यास विशेष व अति सत्र न्यायाधीश-१, शईदा शेख यांनी यांना भा. द. वि. ३६३,३६६-अ, ३७६ तसेच पोक्सो कायदा कलम ३,४ या कलमाखाली दोषी पकडून आरोपीस १० वर्षे शिक्षा व रक्कम रुपये ५०,०००/- दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.


दि. १३ ऑगस्ट २०१५ रोजी, रात्री १०.३० वा. फिर्यादी यांच्या घराजवळून फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून, तिला लग्नाचे आमिष दाखवून, तिला तिचे पालकांचे कायदेशिर रखवालीतून पळवून नेवून, शिर्डी, रांजणगाव पुणे येथे तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध केले. सदर खटल्यात अति. शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ पाटील, यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले व मे कोर्टासमोर सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला.

यातील साक्षीदार फिर्यादी श्री. आबासाहेब बंडगर, शिर्डी, रांजणगाव पुणे येथील लॉज मालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक भालचंद्र पाटील, पिडीता मुलगी व डॉ. रमेश कराड तसचे तपासिक अंमलदार यशवंत महिपत सोळसे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पैरवी कर्मचारी पो. शि. प्रिया सायगावकर, पो.ह. संदेश ठाकूर, पो.शि. सिध्देश पाटील, पो. ह. श्री. सचिन खैरनार, पो. ह. शरद नाईक / ९६७, पो.शि. प्रणिता खताळ, यांचे सहकार्य मोलाचे ठरले सदर खटला हा पोक्सो अॅक्ट मध्ये असल्यामुळे यामध्ये आरोपीच्या दंडातील रक्कम रुपये ३०,०००/- ही पिडीत मुलीला नुकसान भरपाई म्हणून भरपाई दयावीअसाही विशेष व अति. सत्र न्यायाधीश-१, शईदा शेख यांनी आदेश दिला आहे.

Exit mobile version