भात शेतीसाठी सुधारित चतूःसूत्री वरदान

राब भाजणे पद्धत अयोग्य

| पाली | वार्ताहर |

सर्वत्र भातशेतीची पुर्व मशागत करण्यास बळीराजाची लगबग आता सुरु झाली आहे. भात शेती पुर्व मशागती साठी सुधारित चतूःसूत्री वरदान ठरत आहे. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच उत्पादन देखील चांगले मिळते.

मात्र, भात शेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मशागतीची ही पद्धत अयोग्य असून या पद्धतीमुळे प्रदूषण वाढते, वेळ वाया जातो आणि झाडांचीही कत्तल होते. भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात साधारण 90 हजार हेक्टरवर प्रत्यक्ष भाताची लागवड केली जाते. सध्या भातक्षेत्र घटत चालले आहे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यात प्रती हेक्टरी सरासरी 26 ते 28 क्विंटल भाताचे उत्पादन घेतले जाते. परंतु अजूनही येथिल बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. पूर्व मशागत करतेवेळी सर्रास राब / शेतीची भाजणी केली जाते. त्यासाठी शेण्या, पालापाचोळा, झाडांच्या सुक्या फांद्या व पेंढा यांचा वापर केला जातो. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीने राब तयार करण्याची कामे सुरू आहेत. परंतु अशा प्रकारे राब भाजणे हि पद्धत अयोग्य आणि पर्यावरणास धोकादायक आहे. असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, यांनी केव्हाच संशोधन करून सांगितले आहे. तरी याबाबत कृषी कार्यालयाकडून शेतकर्यांचे प्रबोधन करुन त्यांना या संदर्भात फायदे तोटे सांगितले जातात मात्र यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रबोधनाची आवश्यकता आहे.

सुधारीत पद्धत, चार सुत्री/चतूःसुत्री भात लागवड सुत्र - 1 भातपिकाच्या अवशेषांच्या फेरवापर सुत्र - 2 गिरीपुष्पाचा वापर सुत्र - 3 नियंत्रित लागवड सुत्र - 4 युरिया ब्रिकेटचा वापर
चार सुत्री/चतूःसुत्रीचे भात शेतीचे फायदे हे तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकुण लागवडीच्या (बी, मजूर व खत यांचा) खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशिर करणारे आहे. छोटा शेतकरी खरीप / उन्हाळी हंगामात भाताचे सुधारित वाण वापरुन सरासरी 40 क्विंटल प्रती हेक्टर व संकरित भाताचे वाण वापरुन सरासरी 60 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन घेऊ शकतो. असे कृषी तज्ञांचे मत आहे.
आवाहन व जनजागृती राब केल्याने किंवा शेतजमीन भाजल्याने तेथिल जमीनीतील शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात. परिणामी शेतीस पोषण व सेंद्रिय घटक मिळत नाही. तसेच राब भाजण्यासाठी झाडांची तोड होते. प्रदुषण वाढते परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे शेतकर्‍यांनी भात लागवडीसाठी चार सुत्री भातशेतीचा अवलंब करावा. तण काढण्यासाठी तणनाशकाचा वापर करावा. यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना वेळोवेळी माहिती पुरविली जात आहे. शेतकर्यांनी राब भाजणी पद्धतीचा आग्रह करणे टाळावे. असे आवाहन कृषी कार्यालयाकडून नियमित करण्यात येते.
आधुनिक पद्धती बद्दल गैरसमज राब भाजले नाही तर शेतात तण वाढते अशी शेतकर्‍यांची धारणा आहे. तण नाशकाबद्दल गैरसमज असल्याने त्याचा वापर फारसा केला जात नाही. तण नाशकाची फवारणी करण्यापेक्षा जाळणे सोईचे वाटते. फवारणीसाठी मजुरीही द्यावी लागते म्हणून अधिक पैसे जातात असा गैरसमज आहे.
तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर भात पिकात प्रामुख्याने पाखड, धुर, बार्डी, लव्हाळा या तणांचा प्रदुर्भाव दिसुन येतो. रोपवाटीकेतील तणांच्या नियंत्रणासाठी कोकणात मराबफ भाजणे या पारंपारिक पद्धतीचा अवलंब प्रचलित आहे. मात्र हि पद्धत अत्यंत वेळ खाऊ, कष्टप्रद आणि खर्चिक असून पर्यावरणासाठी मारक आहे. शिवाय अशा कामासाठी मजुरांचा तुटवडा सुद्धा जाणवु लागला आहे. भात रोप वाटीकेतील तणांच्या नियंत्रणासाठी अलीकडे तणनाशकांचा वापरही परिणामकारकपणे करण्याचे किफायतशीर तंत्र विकसित करण्यात आले आहे.
राब भाजणीचे दुष्परिणाम राब केल्याने / शेतजमीन भाजल्याने तेथिल जमीनीतल शेतीसाठी उपयुक्त सुक्ष्मजीव नष्ट होतात परिणामी शेतीस पोषण व सेंद्रिय घटक मिळत नाही. तसेच राब भाजण्यासाठी झाडांची तोड होते. प्रदुषण वाढते परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडते. शेतकर्‍यांचा पैसा व श्रम अधिक लागतो.
Exit mobile version