कोळा | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्यावर सोलापूर येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 95 व्या वर्षी पित्ताशयाच्या आजारादरम्यान यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आबासाहेब यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होत असल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, 16 जुलै रोजी सोलापूर येथे आबासाहेब यांना दाखल करण्यात आले. बुधवारी 21 जुलै रोजी त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली असून, नागरिकांनी काळजी करण्याचे काही कारण नाही. राज्यातील सांगोला तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, जनतेचे, नागरिकांचे अनेक फोन येत आहेत. सर्वांच्या कृपाशीर्वादाने साहेब लवकरच घरी परत येतील, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.