। मुंबई । प्रतिनिधी ।
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर सतत त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा सुधारणा झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.