नितीश यांचा भाजपला सूचक इशारा
। पाटणा । वृत्तसंस्था ।
देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास 2024 च्या निवडणुकीत भाजपला देशातील जनताच धडा शिकवेल, असा इशारा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
मणिपूरमधील जदयूच्या सहापैकी पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरुन संतापलेल्या नितीशकुमार यांनी भाजपला आपले लक्ष्य केले आहे. एक गोष्ट सिद्ध होतेय की, लोक कशाप्रकारे काम करत आहेत. इतर पक्षांतील लोकांना आपल्या बाजूने आणने ही संविधानिक बाब आहे का? हे करणे योग्य आहे का? असे प्रश्न उपस्थित त्यांनी उपस्थित केले आहेत.
नितीश कुमार म्हणाले की, आता आम्ही एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सर्व राज्यांतील पक्षाच्या लोकांशी चर्चा झाली. मणिपूरचे सहा आमदार 10 तारखेनंतर बिहारमध्ये आले होते. त्यांनी आनंद व्यक्त केला होता. ते आमच्यासोबत होते. पण आता लक्षात घ्या, काय होत आहे. ते (भाजप) कोणत्याही पक्षाच्या विजयी लोकांना आपल्या बाजूने कसे घेत आहेत, असंही नितीश कुमार म्हणाले.