। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यपदांची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. ही निवडणुक 21 डिसेंबर रोजी संपन्न झाली. अलिबाग तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीमधील जागा रिक्त होत्या.
यामध्ये आवास, काविर, कुरकुंडी, झिराड, बेलकडे, रेवदंडा, बामणगाव, ताडवागळे या ग्रामपंचायतीचा समावेश होता. यामध्ये काविर, कुरकोंडी, झिराड, बेलकडे व रेवदंडा येथील प्रत्येकी एक जागेवर शेकापच्या उमेदवारांची तर आवासमध्ये एक व रेवदंडामध्ये 3 विरोधक उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे बामणगाव व ताडवागळे या ग्रामपंचायत पोटनिवडणूकिची प्रत्यक्ष लढत झाली. या लढतीत शेकापच्या उमेदवारांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळविला.
या निवडणूकित अलिबाग तालुक्यातील बामणगाव व ताडवागळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकित शेकापने बाजी मारली दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये बामणगाव येथील लंकेश नागावकर यांचा 150 मतांनी तर ताडवागळे ग्रामपंचायत पोटनिवडणूकित नावजी शिंद यांचा 30 मतांनी विजय झाला.