। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (दि.२८) पार पडली. यावेळी वेश्वी येथील सरपंच तसेच सदस्यपदाचे सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले. तर नवेदर नवगाव येथे सरपंच पदासाठी दाखल केलेला एक तसेच प्रभाग क्र. 3 मधील एक असे दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता तालुक्यात 31 सदस्यपदांच्या जागांसाठी 88 तर तीन थेट सरपंच पदासाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जात दाखल्याच्या वैधता प्रश्नांमुळे कोप्रोली येथील निवडणूकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला असून एकमेव सदस्यपदासाठीचा अर्ज वैध ठरला आहे.