भिवंडीत महायुतीमध्ये धुसफूस सुरुच

| ठाणे | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाणे ग्रामीण भागातील बहुतांश जिल्हा परिषद, पंचायत समित्यासह शेकडो ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्यानं शिंदे गटाच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यातच भाजपाचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निष्क्रियतेला आमचा विरोध असून असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी म्हटले. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीत उमेदवाराला मदत करणार नाही. पाटील यांनी ग्रामीण भागात शिवसेनेचं खच्चीकरण केलंय. त्यामुळं आमच्या पक्षाचं खच्चीकरण करणार्‍या भाजपाच्या उमेदवाराला विरोध असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मारुती धिर्डे यांनी भाजपाचे उमदेवार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मागील 10 वर्षात मतदारसंघाच्या विकासाकडे कपिल पाटील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी तो निधी विकासकामांमध्ये दृश्यस्वरुपात पहायला मिळत नाही, असाही आरोप ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी केला आहे.

महायुतीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ मागील दोन वर्षाच्या पंचवार्षि प्रमाणे याही वर्षी भाजपाच्या ताब्यात गेल्यानं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. भिवंडी मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये भिवंडी पश्‍चिममधून भाजपचे महेश चौघुले आमदार आहेत. भिवंडी पूर्वमधून समाजवादीचे रईस शेख, कल्याण पश्‍चिम शिंदे गटाचे विश्‍वनाथ भोईर, शहापुरमधून अजित पवार गटाचे दौलत दरोडा, मुरबाड मधून भाजपाचे किसन कथोरे आमदार आहेत.

Exit mobile version