पाटणा | वृत्तसंस्था |
बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी सीकरहाना नदीत बोट उलटल्याने 22 जण बुडाले. स्थानिक लोकांनी 1 मृतदेह बाहेर काढला आहे. बुडालेल्या उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. शिकारगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोधिया गावात हा अपघात झाला आहे. प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे. बोटीवर 20 ते 25 लोक होत.छोट्या नावेत 12 लोकांची आसन क्षमता होती, मात्र 22 पेक्षा जास्त लोक त्यात चढले होते, यामुळे ही बोट नदीच्या मध्यभागी जाताच पाण्यात बुडाली.