| वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ नागरीक संस्था हाशिवरे खारेपाट विभागाची सन 2019-20 व 2020-21 ची वार्षिक सर्वसाधारण सभा चिंचवली ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाली. दिपप्रज्वलनाने सभेला सुरूवात झाली. संस्थेच्या निधन पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून अध्यक्ष जी.एम.पाटील यांनी प्रास्ताविक करताना मागील दोन वर्षांचा आढावा घेताना महिलांचा सन्मान, करिअर मार्गदश्रन शिबीर, मेळावा आदी कार्यक्रमांचा उल्लेख केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रकुख अतिथी सनदी लेखापाल संजय राऊत, पेण येथील पतपेढीचे प्रमुख रविंद्र वाघमारे, ज्येष्ठ नागरीक संघ पोयनाड विभागाचे माजी सचिव विकास पाटील यांचा मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सनदी लेखापाल संजय राऊत यांनी विनामुल्य लेखा परिक्षण करण्याचे जाहीर केले. तर रविंद्र म्हात्रे व विकास पाटील यांनी रोख रक्कम देणगी स्वरूपा दिली. यावेळी सचिव अशोक ठाकूर यांनी इतिवृत्त वाचे तर खजिनदार वाय.बी.पाटील यांनी वार्षिक अंदाजपत्रक मांडले. या सभेला कार्यकारीणी सदस्य कृष्णा धुकाळ, नरहरी म्हात्रे, यशवंत पाटील, सदानंद पाटील, अनंत पाटील, विनय म्हात्रे आदींसह संस्थेचे ज्येष्ठ सभासद हजर होते.







