पं.स.शिक्षण विभागात प्रभारीच कारभारी

वरिष्ठ-कनिष्ठ विस्तार आधिकार्‍यासह अनेक रिक्त
। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केंद्र प्रमुखांच्या अकराही जागा रिक्त असून, गटशिक्षण अधिकारी, वरीष्ठ विस्तार अधिकारी,कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख 11, मुख्याध्यापक 5 अशी अनेक पद रिक्त असून, प्रभारी राज असल्यामुळे महत्त्वाच्या शिक्षण विभागाचे तीनतेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. परिणामी, कार्यरत कर्मचार्‍यांना कामाचा भार वाहून न्यावा लागत आहे.आणि शिक्षणाच्या मुख्य हेतू कडेच दुर्लक्ष होते.

केंद्रप्रमुखांच्या 11 ही जागा रिक्तअसून 11 शिक्षक 11 केंद्रांचा गाडा चालवत आहेत. रिक्त जागांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, गटविकास आधिकारी जिल्हा प्रशासनाचे लक्ष नसल्याने येथील शिक्षण विभागात सावळा गोंधळ आहे. मुख्याध्यापक पाच पदे, पदविधर शिक्षक 56 पदे,उपशिक्षक 31 पदे रिक्त आणि प्रभारी पदांचा गाडा हाकायला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे सर्वच कठीण होत असून शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीमसुध्दा इयत्ता 3-4 थीतील विद्यार्थी करतात. म्हसळा पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत 11 केंद्र येतात म्हसळा, वरवठणे, मेंदडी,नेवरूळ,आडी, चिखलप, पाभरे, पाष्टी, कणधर, संदेरी,आमशेत यामध्ये 96 शाळांचा समावेश आहे,11केंद्रप्रमुख असणार्‍या शिक्षण विभागात 11 शिक्षकांकडे अतिरिक्त प्रभार असून ते केंद्र प्रमुखाचा कारभार पाहात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची पदे भरल्या शिवाय यात बदल होणे शक्य नाही.ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची जबाबदारी असलेल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे.

भौतिक सुविधांच्या कमतरतेसह शिक्षक व एकंदरीत प्रक्रियेवर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या गट शिक्षणाधिकार्यांसह शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक सर्व पदे रिक्त आहेत. या सर्व जागांचा अतिरिक्त पदभार इतरांकडे सोपविण्यात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचे काय?

महादेव पाटील, मा.सभापती, पं. स. म्हसळा
Exit mobile version