। गडचिरोली । प्रतिनिधी ।
गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगरपंचायतींच्या 142 जागांसाठी 555 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इतर मागास प्रवर्गाच्या 11 जागांवर18 जानेवारीला मतदान होणार. भाजप- काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना- आदिवासी विद्यार्थी संघटना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.