कामोठ्यात नागरी समस्यांना ऊत

| कामोठे । वार्ताहर |

सिडकोने विकसित केलेल्या कामोठे नोडमध्ये नागरी समस्यांना ऊत आला आहे. हे शहर जरी झपाट्याने विकसित झाले असले, तरी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने अखंडित पुरवठ्यापाठोपाठ कामोठे नोडमध्ये विजेची समस्या उद्भवली आहे. पक्षभेद, राजकारण बाजूला सारून मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.

प्रतिदिन सुमारे 40 एमएलडी पाण्याची गरज आहे. सिडकोमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्बे धरणातील 37 व महाराष्ट्र औद्योगिक वसाहत प्राधिकरण यांच्याकडून एक एमएलडी विकतचे पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाळ्यातील पाणीटंचाई, पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे पाणी पुरवठ्यावर नेहमीच परिणाम होत आहे. सध्या पाणी पुरवठा सुरळीत होत असताना आता वीज समस्येने डोके वर काढल्याने मानसिक त्रास वाढला आहे. सोमवारी रात्री खारघर येथील वीज वाहिनीत बिघाड झाला होता. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारीदेखील कामोठे नोडचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Exit mobile version