खालापुरात टाटा कंपनीने जोपासली पर्यावरण बांधिलकी

वृक्ष लागवडीचा 50 हजाराचा टप्पा पूर्ण
। खोपोली । वार्ताहर ।
खालापूरात पोलाद उत्पादन करणार्‍या टाटा बी एस एल कंपनी मध्ये 12 हजार वृक्षांची लागवडीचा संकल्प करून त्याचा प्रारंभ राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष त सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आला.वृक्ष लागवडीत कंपनीने 50 हजार वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण केला आहे.

राज्य मंत्री असताना पर्यावरण खाते माझ्याकडे होते आणि प्रदूषण करणार्‍या कारखाने ही माझ्याकडेच नेतृत्व असताना समतोल राखण्याचे काम केले.त्यामुळे नुसती नावासाठी वृक्ष लागवड करून चालणार नाही तर त्याची निगा ही राखली गेली पाहिजे

सचिन अहिर, कामगार नेते


या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना अध्यक्ष सचिनभाऊ आहिर,टाटा स्टील बी एस एल चे वरिष्ठ अधिकारी कपिल मोदी, सावरोली च्या सरपंच प्राची लाड, युनियन संघटनेचे उपाध्यक्ष संजय कदम, सेक्रेटरी तथा सावरोली ग्राम पंचयतीचे सदस्य संतोष बैलमारे, उपरपंच नागेश मेहत्तर , प्रदूषण मंडळ रायगड चे अधिकारी व्ही. व्ही.किल्लेदार ,महादेव शिंदे टाटा स्टील चे सौरभ शर्मा,सी एस आर विभागाचे प्रमुख भावेश रावळ, सिबा प्रसाद पंडा, विनोद चौधरी , विभागीय अधिकारी चंद्रा प्रकाश यासह कामगार प्रतिनिधी व जवळपास एक हजार कामगार या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले होते.
सर्वत्र ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असताना पर्यावरण काळजी घेणे काळाची गरज असताना जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पर्यावरण वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सर्व स्तरावर राबविण्यात आल्या असून याच अनुषंगाने टाटा बी एस एल कंपनी ने मागील तीन वर्षांत 50 हजार वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करून जगविल्यामुळे कारखाना परिसरात पर्यावरण पूरक वातावरण आहे असे टाटा बी एस एल कंपनी चे वरिष्ठ अधिकारी कपिल मोदी यांनी सांगितले. प्रत्येक कामगार कर्मचारी वर्गाने पर्यावरणाचे संदेश देणारे टोपी व टीशर्ट परिधान केले होते.

Exit mobile version