माणगांवमध्ये तीन चोर्‍या लाखोचा ऐवज गायब, दोन दुचाकींचा समावेश

। अलिबाग । प्रतिनिधी ।

माणगाव परिसरात तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोर्‍या झाल्या. त्यामध्ये दोन दुचाकी घरातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम असा एकूण सहा लाख 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

माणगाव तालुक्यातील पोस्को कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर फिर्यादीने त्याची दुचाकी शनिवारी (दि.18) दुपारी पार्कींग करून ठेवली होती. मात्र चोरट्याने ती चोरून नेली. एकूण 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. माणगांवमधील बंद घरात घुसून रविवारी (दि.19) सकाळी चोरट्याने कपाटातील दागीने व रोेख रक्कम असा एकूण चार लाख 98 हजार 400 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. माणगाव एसटी बस स्थानकाच्या आवारात सोमवारी (दि. 20) सकाळी दुचाकी फिर्यादीने पार्कींग केली होती. चोरट्याने ती देखील गायब केली. 85 हजार रुपयांची दुचाकी असून याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी चोर्‍या झाल्याने मालमत्ता सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलीस गांभीर्याने घेतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version