माथेरानमध्ये नितेश राणेंना धक्का; ठाकरेंचे पारडे जड

माथेरानमध्ये स्वाभिमान संघटनेच्या अध्यक्षांसह 40 कार्यकर्ते शिवसेनेत
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे माथेरान अध्यक्ष सागर पाटील यांनी आपल्या 40 सहकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

माथेरानमध्ये शिवसंपर्क अभियान सुरू असून सेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली माथेरान स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा पालिकेच्या समर्थ कामगार सेनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

माथेरान शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात सागर पाटील यांच्यासह स्वाभिमान संघटनेच्या 40 कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला. पक्ष प्रवेशासाठी स्वीकृत नगरसेविका ऋजुता प्रधान तसेच गटनेते नगरसेवक प्रसाद सावंत, शिवसैनिक विकास पार्टे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक शकील पटेल हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version