माथेरानमध्ये पत्रकार स्व. संतोष पवार यांच्या स्मरणार्थ चौकाचे नामकरण

माथेरान | वार्ताहर |
माथेरानचे दिगवंत पत्रकार संतोष पवार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त येथील पंचवटी नगर येथील चौकास त्यांचे नाव देऊन नामकरण करण्यात आले. हा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मागील वर्षी गणेशोत्सव काळामध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचे नऊ सप्टेंबर रोजी निधन झाले होते. त्याचा शोक संपूर्ण माथेरानमध्ये करण्यात आला होता. पत्रकारिता क्षेत्रात 28वर्षे काम करताना त्यांनी माथेरानचे अनेक प्रश्‍न शासन दरबारी पोहचविण्याचे काम केले होते त्यामुळे त्यांचा माथेरानमध्ये आदर होता त्याच मुळे त्यांच्या नावाने येथे येथे माथेरान प्रेस क्लब व माथेरानचे दैनिक पुढारीचे निर्भीड पत्रकार मिलिंद कदम यांनी त्यांचे नाव येथील रस्ता किंवा चौकास द्यावे अशी मागणी केली होती त्यास माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना येथील पंचवटी नगर येथील चौकास त्यांचे नाव देण्याचे पालिकेकडून जाहीर केले त्याचे भूमिपूजन आज उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले ह्यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ह्यावेळी संतोष पवार यांच्या कुटुंबियांसोबत माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे,चंद्रकांत जाधव नगरसेविका सोनम दाभेकर,कार्यतत्पर वनसमिती अध्यक्ष योगेश जाधव, कुलदीप जाधव,प्रकाश सुतार,संजय अभंगे, गणेश पवार व माथेरान मधील असंख्य नागरिक उपस्थित होते.यावेळी संतोष पवार यांची स्मृती कायम स्मरणात राहावी यासाठी महात्मा गांधी मार्गावरील भागात वृक्षारोपण करण्यात आले.

Exit mobile version