। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुरुडची शासकीय कार्यालये व रुग्णालये 450 श्रीसदस्यांनी चकाचक करून प्रतिष्ठानतर्फे स्वछता मोहीम राबवली. तालुक्यात 18 टन कचरा गोळा करून कार्यालये स्वच्छ करण्यात आली. मोहिमेची सुरूवात सकाळी तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सनाब, भरती म्हात्रे, सचिन राजे, संजय तवर आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुरुड तालुक्यातील अगरदांडा, बोर्ली मांडला, नांदगाव येथील सर्व शासकीय कार्यालये व हॉस्पिटल, पोलीस ठाणे येथील कचरा साफ करण्यात आला.