मुख्यमंत्री पदाची प्रत्यक्ष निवडणूक

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

राजिप शाळा सिद्धेश्‍वर येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी तसेच, ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मुख्यमंत्री पदाची प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 29 जून रोजी अर्ज दाखल करून 1 जुलै रोजी उमेदवार अर्ज मागे घेऊन अंतिम उमेदवार यादी करण्यात आली. मुख्यमंत्री पदासाठी जगदीश झोरे, स्वरा मुंढे, ऋग्वेद मोरे हे उमेद्वार होते. 2 जुलै रोजी प्रत्यक्ष मतपत्रिका देऊन विद्यार्थ्यांनी मतदान कक्षात मतदान केले.

यावेळी मतदान प्रतिनिधी म्हणून आराध्य यादव, साईराज कदम, पवन चव्हाण यांनी काम पाहिले. तर, मतदान अधिकारी म्हणून स्वप्नाली मेमाने, जनार्दन भिलारे आणि प्रेसायडिंग ऑफिसर म्हणून मुख्याध्यापिका रोहिणी खामकर यांनी काम पाहिले. मतपेटीतील मते मतदान प्रतिनिधी समोर मोजणी करून सर्वाधिक मते ऋग्वेद मोरे याला मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी खामकर यांनी विजयी घोषित केले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा आनंद प्रात्यक्षिकाद्वारे घेतला. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र यादव, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे यांनी कौतुक केले.

Exit mobile version