73.63 टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील दोन्ही लसींद्वारे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 48 हजार 121 असून त्याची टक्केवारी 29.7 टक्के आहे. तर किमान एक डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची टक्केवारी 73.63 आहे. 1 मार्च 2021 रोजीची अंदाजित लोकसंख्या 29 लाख 83 हजार 848 असून त्यापैकी 21 लाख 92 हजार 532 नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत उपलब्ध लसीनुसार झालेले लसीकरण कमी असून ते वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन कवच कुंडल अभियानातून प्रयत्न करणार आहे.
कोविशिल्डचा पहिला डोस 14 लाख 97 हजार 311 तर दुसरा डोस 5 लाख 63 हजार 468 नागरिकांचा पूर्ण झाला आहे, असे एकूण 20 लाख 60 हजार 779 नागरिकांचे कोविशिल्ड लसीद्वारे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे कोवॅक्सिनचा पहिला डोस 1 लाख 16 हजार 991 तर दुसरा डोस 84 हजार 653 नागरिकांचा पूर्ण झाला आहे, असे 2 लाख 1 हजार 644 नागरिकांचे कोवॅक्सिन लसीद्वारे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अशा प्रकारे दोनही लसीद्वारे एकूण 22 लाख 62 हजार 423 नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
एकूण लोकसंख्येपैकी पहिला डोस प्रलंबित असणार्या नागरिकांची संख्या 5 लाख 78 हजार 230 असून दुसरा डोस प्रलंबित असलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 66 हजार 181 आहे. दोन्ही लसींद्वारे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 48 हजार 121 असून त्याची टक्केवारी 29.7 टक्के आहे तर किमान एक डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची टक्केवारी 73.63 आहे.
जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवायची आहे. या मोहिमेत अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांना पहिला डोस देण्यास प्राधान्य दिले जाणार असून प्रत्येक विभागाने ज्या नागरिकांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही, अशा नागरिकांचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने अत्यंत काटेकोर नियोजन करावे.
डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी