| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी दीड वाजेपर्यंत सात तासात 44.86 टक्के मतदान झाले. सात लाख 62 हजार 738 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख 83 हजार 074 पुरुष व 3 लाख 79 हजार 662 महिला तसेच इतर दोन मतदारांचा समावेश आहे. मतदान करण्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
जिल्ह्यात पनवेल तालुक्यात 46.27 टक्के, कर्जतमध्ये 47.70 टक्के, खालापूरमध्ये 46.53 टक्के, सुधागडमध्ये 43.05 टक्के, पेणमध्ये 45.15 टक्के, उरणमध्ये 48.64 टक्के, अलिबागमध्ये 46.08 टक्के, मुरूडमध्ये 44.16 टक्के, रोहामध्ये 43.06 टक्के, तळामध्ये 40.70 टक्के, माणगावमध्ये 42.28 टक्के, म्हसळामध्ये 36.47 टक्के, श्रीवर्धनमध्ये 37.63 टक्के आणि महाडमध्ये 44.15 टक्के, पोलादपूरमध्ये 44.15 टक्के मतदान झाले. या सात तासात पनवेल, कर्जत, अलिबाग, खालापूर, महाडमध्ये अधिक मतदान झाले.







