तिसरं विश्वयुद्ध झालं तर अणुबॉम्बचा वापर केला जाईल; रशियाने केलं वक्तव्य

। मुंबई । वृत्तसंस्था ।
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक सूचक विधान केलं आहे. लावरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच अण्विक असेल असं म्हटलंय. “तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल,” असं लावरोव्ह म्हटल्याचं आरआयए या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करताना किव्हला म्हणजेच युक्रेनला अण्वस्त्रं मिळाली तर ते रशियासाठी फार धोकादायक ठरु शकतं असं म्हटलं आहे. सर्गेई लावरोव्ह यांनी युक्रेनकडे अणवस्त्र असण्याला रशियाला कायमच विरोध करेल असे संकेतही दिले आहेत.

रशियाकडे किती अणु बॉम्ब?
रशियाकडे विविध क्षमतेचे अणु बॉम्ब आहेत. म्हणजे हिरोशिमा -नागासाकी वर टाकलेल्या अणु बॉम्बच्या संहारक शक्तीपेक्षा हजारपट शक्तीशाली अणुबॉम्ब रशियाकडे आहेत. गेल्या अनेक वर्षातले संशोधन आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या बॅगेत सहज राहील अशा आकाराचे, किरणोत्साराचे उत्सर्जन जास्त पण उष्णतेमुळे विध्वंस कमी होईल अशा प्रकारचे अणु बॉम्बही विकसित करण्यात आले आहेत. तेव्हा असेही अणु बॉम्ब रशियाकडे असावेत असा अंदाज आहे. एका अंदाजानुसार रशियाकडे सहा हजारांहून अधिक अणु बॉम्ब आहेत.

Exit mobile version