| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अमृतेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुजारी पांडुरंग गाणार यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत पूजाअर्चा व अभिषेक करण्यात आला. यावेळी अमृतेश्वर मंदिर पंचकमिटी अध्यक्ष उमाकांत चोरघे, उपाध्यक्ष कुसूमाकर घुमकर, विद्याधर चोरघे, सचिव प्रभाकर निरकर, खजिनदार निरकर गुरुजी, सदस्य विष्णू नागावकर, सचिन पाटील, जितेंद्र भाटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी अमृतेश्वर मंदिर पंचकमिटीतर्फे रायगड भूषण पुरस्कार मिळालेल्या कीर्तनकार धनंजय बुवा गद्रे, विद्याधर चोरघे तसेच महेश कोतवाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.







