पायरीचीवाडी क्रिकेट स्पर्धेत सुहास इलेव्हन संघाची बाजी

। पाली /गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील श्री दत्तात्रेय क्रीडा मंडळ पायरीचीवाडी यांच्यावतीने अंडरआर्म स्पर्धेचे आयोजन दि.4, 5, 6 रोजी केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील इच्छुक 50 संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत सुहास इलेव्हन खवली आणि यारी दोस्ती या दोन संघात झाली. या अंतिम सामन्यात खवली संघ विजयी झाला. या संघास 10 हजार रूपये व आकर्षक चषक, उपविजेता यारी दोस्ती संघास 7 हजार रूपये व आकर्षक चषक तर तृतीय जांभूळपाडा संघास 5 हजार रूपये व आकर्षक चषक तर चतुर्थ जागसुद देव पोटलज संघास आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सूरज नाटे, उत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश, क्षेत्ररक्षक आशिष दरगे या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version