। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या 50 वर्षात कालनिर्णयमधून प्रकाशित झालेल्या काही निवडक पाककृतींचे संकलन करून कालनिर्णय निवडक पाकृती 1973-2021 हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. इंटरनेटवर आज विविध पाककृती उपलब्ध असल्या तरी 1970च्या दशकात जगभरातील विविध पाककृती जाणून घेण्यासाठी अनुभवी सुगरणी किंवा पाककृतींच्या पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता. 1973 मध्ये कालनिर्णयमध्ये प्रकाशित होणार्या पाककृतींच्या माध्यमातून नवख्यांना स्वयंपाकघरात येण्याचे प्रोत्साहन मिळाले तर पाककलेत पारंगत गृहिणींना नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळाली.
1973 ते 2021 पर्यंत प्रसिद्ध झालेल्या अशाच निवडक पाककृतींचे संकलन या पुस्तकात आहे. संपादन मोहसिना मुकादम यांनी केले असून प्रकाशन सुमंगल सांस्कृतिक प्रकाशनने केले आहे. या पुस्तकाची किंमत 150 रूपये आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने कालनिर्णयने काही पुस्तके पुर्नप्रकाशित तर काही पुस्तके नव्याने प्रकाशित केली आहेत. ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज आणि भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कालनिर्णयच्या निवडक पाककृती पुस्तक रूपात
