राज्यात लाहीलाही; माथेरानमध्ये थंडावा

पर्यटक घेतात वातावरणाचा आनंद, सकाळ संध्याकाळ पक्षांचा किलबिलाट


| माथेरान | वार्ताहर |

राज्यात सर्वत्र उन्हाचे चटके जाणवत असताना आणि जिव्हाची लाही लाही होत असताना माथेरान मध्ये मात्र वातावरण हे अगदी आल्हाददायक असून थंडावा कायम आहे.आणि त्याच बरोबर या पर्यटन नगरीला वसंत ऋतूने घेरले असून याचा अनुभव येथे येणार्‍या पर्यटकाला घेता येत आहे. त्यामुळे येथे येणारा पर्यटक सुखावला जात असून या गिरीशिखरावर पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.

वसंत ऋतूची चाहूल लागताच माथेरानच्या निसर्गात अमुलाग्र बदल व्हायला सुरवात होते. इतर शहरांपेक्षा येथे माथेरानमध्ये वसंत ऋतू थोडा उशिराने प्रवेश करतो एप्रिल महिन्यात त्याचे खरे स्वरूप पहावयास मिळते.येथे अनेक झाडांना नवीन पालवी फुलल्याने या गिरीशिखराचा माथा या दिवसात हिरवागार होत असतो या काळात रानमेवा फुलत असल्याने जंगलात आंबा, जांभूळ, करवंद, कोकम सारख्या झाडांचा सुगंध दरवळत असतो व त्याची प्रत्यक्ष अनुभूती जंगलात भटकंती करीत अनेक निसर्ग प्रेमी घेत असतात.

वसंत ऋतु हा सगळ्या ऋतूंमधून सगळ्यात चांगला ऋतु समजला जातो.याचे कारण या वसंत ऋतू मधे खूप जास्त थंडी पण जाणवत नाही आणि खूप जास्त उकाडा देखील जाणवत नाही. या ऋतूत वातावरण खूपच प्रसन्न असते व दिवसभर मस्त वार्‍याच्या झुळूक वाहत असतात. त्यामुळे राज्यात सर्वत उन्हाचे चटके जाणवत असताना आणि जिव्हाची लाही लाही होत असताना माथेरान मध्ये मात्र वातावरण हे अगदी आल्हाददायक असून थंडावा कायम आहे. या वसंत ऋतूच्या या विशेषनामुळे वसंत ऋतुला सर्व ऋतूंचा राजा सांगितले जाते. सध्या माथेरानकडे विविध स्थलांतरित पक्षी माथेरानमध्ये दिसू लागले आहेत. सकाळ संध्याकाळ सर्वत्र पक्षांचा किलबिलाट सुरू असून या येथील वातावरणाचा आनंद पर्यटक घेत आहेत सर्वत्र हिरवीगार असलेल्या वनराई मुळे वातावरणातील थंडाव्या मुळे हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ होऊ लागले असून पर्यटकांचा ओढा या गिरीशिखरावर वाढताना दिसत आहे.

Exit mobile version