यंदा जोरदार पगारवाढ

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यावर्षी देशातील कर्मचार्‍यांच्या पगारात चांगली वाढ होईल, असा अंदाज टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय पुढच्या काही वर्षांत अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रात सुमारे 1 कोटी 20 लाख नोकर्‍या उपलब्ध होतील, असेही या अहवालात म्हटले आहे. तसंच कर्मचार्‍यांच्या पगारात सरासरी 9.1 टक्के वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान आणि डिजिटलच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून, पुढील काही वर्षांत या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहेत. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील. एकूण रोजगाराच्या 17 टक्के संधी अत्यंत कुशल आणि विशेष तज्ज्ञ कर्मचारी किंवा व्यावसायिक कामगारांना उपलब्ध असतील, असे अहवालात म्हटले आहे.

Exit mobile version