। उरण । प्रतिनिधी ।
उरण येथील बाजारपेठेत दिशा संगणक इन्स्टिट्यूटचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील उपस्थित होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले की, दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून माफक दरात विद्यार्थ्यांना व कामगारांना कोर्सचे ज्ञान दिले जाणार आहे. राज्यामध्ये 230 संस्थामधून तांत्रिक प्रशिक्षण प्रदान करते. उरणमध्ये व तालुक्यातील सर्वांना याचा निश्चितच लाभ मिळणार आहे. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अल्प दरात प्रशिक्षण देण्याचे काम या इन्स्टिट्यूटमधून करण्यात येणार असल्याचे प्रीतम म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले.