| रेवदंडा | महेंद्र खैरे |
चौल ग्रामपंचायतीचे आग्राव, चुनेकोळीवाडा व सराई येथे जलशुध्दीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उबाठा शिवसेना प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांचेसह माजी प.स.सदस्य विश्वनाथभाई मळेकर, चौल ग्रा.प.सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजीत गुरव, ग्रा.प.सदस्य अजीत मिसाळ ग्रामविकास अधिकारी ॠतिका पाटील, ग्रा.प.सदस्या निवेदिता मळेकर, तसेच आग्राव उबाठा शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. प्रसंगी आग्राव जेष्ठ ग्रामस्थांचे हस्ते श्रीफळ वाढवून तसेच, सुरेंद्र म्हात्रे यांचे हस्ते प्रथमच पाणी वितरीत करण्यात आले.
चौल ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या पाच वर्षात स्थानिक ग्रामस्थांना शुध्द पाणी पिण्यास मिळावे या हेतूने पाच जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहे. तसेच, जलजीवन मिशन अंतर्गत चौल भोवाळेनजीक पाणी पुरवठा योजनेचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. लवकरच चौल ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात चौल ग्रामपंचायत यशस्वी होणार आहे, असे शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी माहिती दिली.